English Proverbs to Marathi
1. The pen is tongue of the mind.
लेखनी ही मनाची जीभ आहे.
2. The fig for the doctor when cured.
गरज सरो वैद्य मरो
3. The small link will sink a great ship.
एखादे लहानसे छिद्र देखिल विशाल जहाजाला बुडवते.
4. A bad workman blames his tools.
नाचता येईना आंगण वाकडे.
5. The drowning man will clutch at a straw.
बुडत्याला काडिचा आधार.
6. Every dog has its day.
चार दिवस सासुचे चार दिवस सुनेचे.
7. Empty vessels make more noise.
उथळ पाण्याला खळखळाट फार.
8. Listen to people but obey your conscience.
ऐकावे जनाचे करावे मनाचे.
9. Action speak louder than word.
शब्दापेक्षा कृती महत्वाची.
10. Self is the best help.
स्वत:हून केलेली मदत हीच श्रेष्ठ मदत.
11. All the glitters is not gold.
चकाकते ते सोने नसते.
12. Necessity is the mother of invention.
गरज शोधाची जननी आहे.
13. No pain no gain.
कष्टाविना फळ नाही.
14. Well begun is half done.
चांगली सुरुवात म्हणजे अर्धे काम झालेच समजा.
15.A friend in need is friend indeed.
संकट काळात मदत करतो तोच खरा मित्र.
16. It’s no use crying over split milk.
पश्चाताप बुद्धी कामाची नाही.
17. It never rain but it pour.
संकट आले की मोठ्या प्रमाणावर येतात.
18.Look before you leap.
प्रत्येक पाऊल जपून टाकावे.
19. A new broom sweeps clean.
नव्या दमाने काम करणाऱ्या माणसा कडुन जास्त काम होते.
20. One good turn deserve another.
दुसर्याच्या कमाचे फक्त कौतुक करु नका तर त्याचे अनुसरण करा.
उपकाराची फेड उपकाराने करावी.
21. Out of sight out of mind.
नजरे आड़ झालेल्या वस्तुचा विसर पडतो.
22. A rolling stone gathers no mass.
एक ना धड़ भराभर चिंध्या.
23. Bad news travel fast.
वाईट बातम्या झपाट्याने पसरतात.
24. Strike while the iron is hot.
परिस्थिति अनुकूल असताना काम करावे.
25. That’s the way the cookie crumbles.
हीच जगाची रीत आहे.
26. All’s well that ends well.
ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड.
27. There is a time and place for everything.
प्रत्येक गोष्ट करताना काळ व वेळ पाहणे गरजेचे आहे.
28. Union is strength.
एकी हेच बळ.
29. The wearer knows where the shoe pinches.
ज्याच जळत त्यालाच कळत .
30. Slow and steady wins the race.
शांत आणि स्थिर चित्ताने काम करणारा मनुष्य यशस्वी होतो.
31. Rome was not build in a day.
कोणतीही गोष्ट एका दिवसात पूर्ण होत नाही.
32. Prevention is better than cure.
खबरदारी ही उपायापेक्षा चांगली.
33. Might is right.
बळी तो कान पीळी.
34. Man proposes god disposes.
मनुष्य ठरवतो एक होत दुसरच.
35. Money makes the mare go.
काम करी दाम.
36. Health is wealth.
शरीर हीच संपत्ति.
37. Charity begins at home.
सत्कार्याची सुरुवात आपल्या पासून करावी.
38. Absence makes the heart grow fonder.
विरह, अभाव किंवा अनुपस्थिति मुळे एखाद्या गोष्टीची गोडी वाढते.
39. All road lead to Rome.
सर्व रस्ते रोमकडे जातात.
40. Be slow of tongue and quick of eyes.
बोलण्यात शांत व नजर चलाख हवी.
41. Life is drama, man is actor and God is director.
जीवन एक नाटक आहे , माणूस हा कलाकार आहे आणि देव दिग्दर्शक आहे.
42. Life is love, enjoy it.
जीवनावर प्रेम करण्यात खरा आनंद आहे.
43. Courage is the surest weapon in danger.
संकटकाळी सर्वांच्या उपयोगी पडणारे हत्यार म्हणजे धैर्य होय.
44. Better late than never.
कधीही न करण्यापेक्षा , उशीरा का होईना एखादी गोष्ट करणे कधीही चांगले.
45. Forbidden fruit is the sweetest one.
निषिध्द गोष्टीचे माणसाला अधिक आकर्षण असते.
46. It is never to late to mend.
सुधारणेला उशीर कधीच होत नसतो.
47. It never rains but it pours.
संकटे ही एकटी दुकटी कधीच येत नसतात.
48. Never judge by appearance.
दिसते तसे नसते.
49. A stich in time saves nine.
वेळेवर उपाय केले तर मोठी हानी टळते.
50 Sound mind in sound body.
सुदृढ शरीरात सुदृढ मन वास करते.
51. Time and tide waits for none.
वेळ आणि संधि कोणासाठी थांबत नाही.
52. No flowery path leads to fame.
प्रसिद्धी कडे जाणारा मार्ग सुखकारक नसतो.
53. Man in known by his company.
माणसाची पारख त्याच्या सभोवतालच्या व्यक्तिवरुन होते.
54. Success is achieved by those who dare and act for it.
जे यशासाठी लढतात त्यांनाच यश मिळते.
55. Don’t cross a bridge, until you come to it.
संकटे येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसु नका.
56. Service to man is service to god.
मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा.
57. As the king so are the subjects.
यथा राजा तथा प्रजा.
58. The early bird catches the worm.
हाजीर तो वजीर.
59. It takes two to make quarrel.
एका हाताने टाळी वाजत नाही.
60. A word is enough for the wise.
शहाण्याला शब्दाचा मार.
61 United we stand, divided we fall.
ऐक्यातून उन्नति , दुहितून अधोगति.
62 contentment is happiness.
संतोष हेच परमसुख.
63. Better be alone than in bad company.
वाईटाच्या संगतित राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले.
64. God made man , man made money , money made man mad.
देव माणूस बनवतो, माणूस पैसा बनवतो व पैसा माणसाला वेडे बनवतो.
65. A bird in hand is worth than two in the bush.
हतातले सोडून पळत्याच्या मागे लागू नये.
66. Blood is thicker than water.
मैत्री पेक्षा नाते बलवत्तर ठरते.
67. Every tide has its ebb.
जीवनात चढ़ उतार असायचेच.
68. A pearl before swine.
गाढवाला गुळाची चव काय.
69. Society moulds man.
खाण तशी माती.
70. A good laugh is sunshine in a house.
सुहास्य हे घरात सूर्यप्रकाशासारखे असते.
71. Fire purifies gold.
खर सोन अग्नितून तावून सुलाखून निघत.
72. Fire of love purifies heart.
प्रेमाची आग हृदय शुद्ध करते.
73. Suffering of love purify mind.
प्रेमाचा चटका मन शुद्ध करतो.
74. Practice makes man perfect.
प्रयत्नाने माणूस परिपूर्ण होतो.
75. God helps those who help themselves.
जे स्वत: ला मदत करतात त्यांनाच देव मदत करतो.
76. As you made your bed so you must lie in it.
अंथरून पाहुन पाय पसरावे.
77. Knowledge is power.
ज्ञान हेच सामर्थ्य.
Good service of the world